परंडा / प्रतिनिधी - 

 परंडा तालुक्यातील इनगोदा येथील दयानंद ज्ञानदेव पवार यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी तर लक्ष्मण विठठल जगताप यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली .

 येथील ग्रा.प . कार्यालयात दी. १८ रोजी बैठक घेण्यात आली या बैठकित गावातील नागरिकांच्या  सर्वानुमते हि निवड बिनविरोध करण्यात आली . यावेळी उपसरपंच अभिमान औसरे , माजी सरपंच रावसाहेब पाटील , शिवसेना युवा नेते हनुमंत जगताप ,ग्रा. प. सदस्य अमोल पाटील , अण्णा बारवकर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . निवडीनतर नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा माजी सरपंच रावसाहेब पाटील व शिवसेना नेते हनुमंत जगताप यांनी शाल, श्रीफळ , फेटा बांधून सत्कार केला . त्यांच्या निवडी नंतर एकच जल्लोष करण्यात आला .


 
Top