उस्मानाबाद  / प्रतिनिधी :- 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, पालकमंत्री, खासदार , आमदार यांनी केलेल्या सहकाऱ्यांमुळेच शहरातील भुयारी गटारीसाठी १६८ कोटी व शहरातील विविध भागातील रस्ते, पुल व धारासुर मर्दिनी मंदिर आणि हजरत ख्वाँजा शम्सशोद्दीन गाजी दर्गा येथील परिसर विकसीत करने या सर्व कामांसाठी ४० कोटी रुपयांची तांत्रिकसह सर्व प्रकारची मंजुरी ११ मे २०२१ रोजी मिळाली असून येत्या दोन महिन्यात भुयारी गटारीची कामे चालु होतील, अशी माहिती नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी शनिवार दि. ४ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी शिनसेनेचे गटनेता सोमनाथ गुरव, राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रदिप घोणे उपस्थित होते. अधिक माहिती देताना नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी सांगितले की, कोवीडमुळे सर्व विकास निधीवर मर्यांदा आली आहे, असे असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे,  पालकमंत्री गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, मंत्रालयातील अधिकारी वर्ग या सर्वांच्या सहकाऱ्यांने पाठपुरावा केल्यामुळे २०८ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, असे  राजेनिंबाळकर यांनी सांगितले आहे. 

प्रतिव्यक्ती १३५ लिटर पाण्याची आवश्यकता 

भुयारी गटारीसाठी प्रतिव्यक्ती १३५ लिटर पाणी देणे आवश्यक होते. त्यामुळे उजनीच्या पंपींग मशनरीची क्षमता अमृत योजनेतंर्गत दुप्पट केली. याबरोबरच इतर कांही निकष आम्ही पुर्ण केल्यामुळेच आत्तापर्यंत झालेल्या घोषणेला मुहूर्त स्वरूप आले आहे.

१०० कोटी रुपयेच मंजुर 

 कोवीड मुळे विकास निधीवर मर्यांदा आली होती. त्यामुळे भुयारी गटासाठी प्रथम १०० कोटी रुपयेच मंजुर झाले होते. परंतु पाठपुराव्यानंतर १६८ कोटी मंजुर झाले. या विकासातील पहिल्या टप्प्यात कृष्णा-खोऱ्यातील सर्व कामे होतील तर दुसऱ्या टप्प्यात शहरातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या पुर्वेकडील गोदावरी खोऱ्यातील विकास कामे होणार आहे. 

भुयारी गटारांचे पाणी जाणार कोठे?

 विकास कामासाठी मंजुर झालेले पैसे हे िवकास कामाला विलंब झाला तर परत जाणार नाहीत, त्यासाठी फक्त ६-६ महिन्यानंतर प्रशासकीय मान्यता घेण्यात येईल. शहरात भुयारी गटारी बांधल्यानंतर सेफ्टी टँक बांधण्याची गरज नागरिकांना राहणार नाही. शहरातील भुयारी गटरांचे पाणी पाईप लाईनद्वारे भोगावती नदीच्या काठावरून वैराग नाक्यापाशी येऊन त्या पाण्याचे पुर्नरवापर प्रक्रिया करून ते पाणी राघुच्यावाडीतील तलावात सोडले जाणार आहे. 

 
Top