तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील पांगरदरवाडी येथे  दोन वर्षीय लहान बालकास डेंग्यू सदृश आजाराची लागण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतने गाव स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार स्वच्छतेच्या तक्रारी करूनही गाव स्वच्छ केले जात नसल्यामुळे ग्रामस्थांतुन संताप व्यक्त होत आहे.

 ग्रामपंचायतीकडून गावात एकदाही डास प्रतिबंदात्मक मोहीम राबवली नसल्यामुळे डासांच्या उत्तपतित वाढ झाली आहे. परिणामी साथरोगाचे प्रमाण वाढले आहे. दोन वर्षीय मंदार गणेश गायकवाड (रा.पांगरदरवाडी) या चिमुकल्यास डेंग्यू सदृश आजाराची लागण झाली असून त्याच्यावर तुळजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ग्रामपंचायतने तात्काळ नालीसफाई करुन संपूर्ण गावात धुर फवारणी करावी,अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

 

 
Top