तुळजापूर / प्रतिनिधी-

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या मंदीरातील गाभाऱ्यात बैलपोळा दर्शअमावस्या दिनी सोमवार दि.६रोजी  सांयकाळी बैलजोडीचे  पुजन करुन पारंपरिक पध्दतीने पोळा सण साजरा करण्यात आला.

सांयकाळी येथील कमानवेस भागातील डुल्या हनुमान मंदीरापासुन बैलजोड्या वाजत गाजत राजेशहाजीमहाध्दार मधुन मंदीरात नेण्यात आल्या. त्यापैकी एक बैलजोडी थेट मंदीरातील चोपदार दरवाजा जवळ नेण्यात आली तिथे बैलांची पुजाअर्चा करण्यात आली. यावेळी मंहत वाकोजीबुवा, गुरुतुकोजीबुवा,  मंहत हमरोजीबुवा, मंदीर धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, विश्वास कदम, पुजारी,  मंदीर कर्मचारी उपस्थितीत होते.

 शेतकरी कुंटुंबियांनी आपल्या बैलजोड्यांना प्रथम ग्रामदेवतेच्या मंदीरात नेऊन नंतर घरी सहकुंटुंब बैलजोडीचे तसेच गायीचे पुजन करुन त्यांना गोडधोड खावू घालुन बैलपोळा साधेपणाने साजरा केला तर ज्यांच्या बैलजोड्या नाहीत अशांनी  चार बैल, एक  गाय विकत आणुन त्याचे पुजन करुन बैलपोळा साजरा केला.

 

 
Top