तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील आरळीखुर्द ग्रामपंचायतची ग्रामसभा शनिवार दि.४ रोजी संपन्न झाली.सरपंच सौ. पल्लवी सतिश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक बी.बी कुंभार यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा झाली .

या ग्रामसभेत श्री महादेव देवबा गायकवाड यांची आरळी खुर्द गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्यानंतर पाणीपुरवठा समिती, दक्षता समिती, ग्रामसुरक्षा समिती ,ई समित्या स्थापन करण्यात आल्या, मग्रारोह योजना कृती आराखडा व जलजीवन मिशन यावर या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली.

कोरोना नियम अटी शर्तीचे पालन करीत ही ग्रामसभा खेळीमेळीचा वातावरण पार पडली. शेवटी उपस्थितीतांचे ग्रामसेवक बी.बी कुंभार यांनी आभार मानले.


 
Top