परंडा / प्रतिनिधी : -

 परंडा तालुक्यातील अनाळा येथे स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था उस्मानाबाद यांच्या वतीने १० रोजी शेळीपालन प्रशिक्षण घेण्यात आले.या प्रशिक्षणामध्ये शेळीपालन , गांडुळ खत निर्मिती बेड या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

अनाळा येथील आसिफा शेख यांच्या शेतात गांडूळ खत निर्मिती बेड ची उभारणी स्वयंम शिक्षण प्रयोग भूम - परंडा तालुका समन्वयक सीमा सय्यद यांच्या हस्ते करण्यातआले.    यावेळी सय्यद यांनी महिलांना गांडुळ खत निर्मिती , बायोगॅस ‘ बंदिस्त शेळी पालन , विविध शासकिय योजनेची माहिती दिली . यावेळी तालुक्यातील दहा गावातील लिडर व महिला उपस्थित होत्या.स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था तालुक्यातील अनाळा , शेळगांव , मलकापूर , रोहकल , कार्ला , पिंपरखेड , साकत बु , साकत खु , पिस्तमवाडी गावात विविध योजना राबवत आहे. यामध्ये गांडुळ खत निर्मिती , बायोगॅस , शेळीपालन यावर संस्थेचा अधिक भर आहे.वरिल गावात प्रत्येकी एका शेळी गटाची निर्मिती करण्यात आली असून त्यासाठी प्रत्येक गावात एका लिडर ची निवड करण्यात आलीआहे.  गावातील त्या गटांना संस्थेमार्फत बँक वित्त पुरवठा करणार आहे.स्वंयम शिक्षण प्रयोग संस्थेचे जिल्हा समन्वयक किरण माने यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु आहे. संस्थे च्या विविध योजना मुळे महिलांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी सुपरवायझर सौ.नौशाद शेख व पल्लवी माने यांनी परिश्रम घेतले .


 
Top