उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उस्मानाबादेत गेल्या अनेक वर्षांपासून उपकेंद्र आहे. या उपकेंद्रचे पुर्ण विद्यापीठ होण्यासाठी जे आवश्यक बेसीक स्ट्रक्चर लागते ते पुर्ण तयार होत आले आहे.त्यामुळे या उपकेंद्राचे पुर्ण विद्यापीठात रूपांतर करायला कांहीच हरकत नाही, परंतु उच्च तंत्र शिक्षकमंत्री उदासीन आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते व सिनेट मेंबर संजय निंबाळकर यांनी पु.वि.लोकराज्यशी बोलताना दिली.  तर शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी उपकेंद्राचे पुर्ण विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून बेसीक स्ट्रक्चर उभा करण्यासाठी सरकार ने पैसे उपलब्ध करून दिले आहेत. लवकरच पुर्ण विद्यापीठ उभा राहिल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

अधिक माहिती देताना निंबाळकर म्हणाले की, १० वर्षांनंतर उपकेंद्राचे पुर्ण विद्यापीठात रूपांतर होत असते. परंतू आपल्या उपकंेद्राबाबतीत कांहीतरी कारणे सांगितले जातात. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे विभाजन होऊन सोलापूर येथे नव्याने विद्यापीठ झाले नाही का असा प्रश्न उपस्थित करून संजय निंबाळकर यांनी उस्मानाबादेतील उपकेंद्रात विद्यापीठासाठी लागणारा ५० टक्के स्टॉफ तयारआहे. त्याच प्रमाणे संवैधानिक पदे तयार आहेत. त्याचप्रमाणे ३ मोठया इमारती तयार आहेत. ग्रंथालयाची इमारत तयार आहे. गेस्टहाऊस, कॅन्टींग, सायन्स भवन, प्रशासकीय इमारत, वसतीगृह आदी इमारती तयार आहेत.  विशेष म्हणजे कोणत्याही उपकेंद्रात नसतील, असे १० पीजी अभ्यासक्रम उपकेंद्रात चालू आहेत.जिल्हयात एकुण ८० महाविद्यालय असून डॉ.बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठातंर्गत ५०० कॉलेज आहेत. त्यामुळे कामाचा लोड ही वाढला आहे.उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे पुर्ण विद्यापीठात रूपांतर झाल्यास लोड कमी होऊन उस्मानाबाद जिल्हयातील महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळेल, असे संागितले.या संदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या  मॅनेजमेंट बैठकीत अनेकदा ठराव झाले. परंतू त्याची अंमलबजावणी होत नाही. 

सर्वकांही अनुकूल

राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. उच्चतंत्र शिक्षणमंत्री, त्याचप्रमाणे उस्मानाबाद जिल्हयाचे खासदार आणि आमदार हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे सर्व परिस्थिती अनुकूल असताना विद्यापीठ उपकेंद्राचे पुर्ण विद्यापीठात रूपांतर करायला कांहीच हरकत नाही. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा व विकासाचा ध्यास व दृष्टी लागते. विशेष म्हणजे १६ ऑगस्ट रोजी या उपकेंद्राचा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने पुर्ण विद्यापीठ जाहीर झाल्यास अधिक आनंद होईल विद्यापीठ अभ्यास समितीवर मध्यंतरी आपली निवड झाल्याचे माध्यमातुन माहित झाले. परंतू अधिकृत, असे कांही पत्रक आले नाही, अथवा कधी बैठक ही झाली नाही, अशी प्रतिक्रया नाव न छापण्याच्या अटीवर एका ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष यांनी दिली. 


 
Top