उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील वंजारी समाजाचे नेते पांडुरंग लाटे यांची वंजारी सेवा संघाच्या मराठवाडा विभाग सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस विधीज्ञ नितीन भोसले, प्रदीप शिंदे, पिराजी मंजुळे, गजानन नलावडे, विजय शिंगाडे, संतोष क्षीरसागर, गणेश मोरे, शाम तेरकर, अतुल चव्हाण तसेच शहर व ग्रामीण भागातील भाजपचे  कार्यकर्ते उपस्थित होते.

या निवडीनंतर बोलताना लाटे म्हणाले की, बहुजन समाजाला शासनाच्या योजनेचा फायदा व्हावा यासाठी मी सतत प्रयत्नशील राहणार आहे. तसेच या समाजाला न्याय मिळावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असून या वर्गाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


 
Top