तुळजापूर / प्रतिनिधी-

येथील उपजिल्हा रुग्णालय तात्काळ सुरू करावे,या प्रमुख मागणीसाठी रुग्णालयाच्या रेंगाळलेल्या इमारती समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने  एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले, दरम्यान दुपारी ३:०० वा.जिल्हाशल्यचिकित्सक यांच्या सूचनेनुसार या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मुल्ला यांनी उपोषण स्थळी भेट देऊन येत्या १५ दिवसात हे रूग्णालय सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिले. 

 यावेळी जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे, जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, जनहित कक्ष,विधी विभागाचे ऍड.मतीन बाडेवाले, तालुका सरचिटणीस गणेश पाटील,उपतालुकाध्यक्ष आकाश पवार, नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,शहर संघटक रवी राठोड, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, तुळजापूर मनविसे शहराध्यक्ष ऋषी माने,शहर सचिव आवेज इनामदार, सूरज अंगुले, अजित कांबळे, संदीप वैद्य, निखिल येडगे,मारुती पांचाळ आदी उपस्थित होते.


 
Top