लोहारा/प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन दिन दि.15 ऑगस्ट रोजी लोहारा शहरातील व तालुक्यातील शासकीय कार्यालयात व निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करुन उत्साहात साजरा करण्यात आला. 

लोहारा शहरातील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मुख्य शासकिय ध्वजारोहण तहसीलदार संतोष रूईकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी समन्वय माजी तालुकाध्यक्ष नागण्णा वकील, माजी सरपंच शंकर अण्णा जटे, प्रथम नगराध्यक्षा पोर्णिमाताई लांडगे, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, माजी नगरसेवक अभिमान खराडे, जगदिश लांडगे, माजी पं.स.सदस्य दिपक रोडगे, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल्य स्वामी, राजेंद्र कदम, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, हाजी बाबा शेख, नितीन जाधव, माजी नगरसेवक शाम नारायणकर, यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक पत्रकार उपस्थित होते. पं.स.चे ध्वजारोहण पं.स.सभापती हेमलता रणखांब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती व्यंकट कोरे, गटविकास अधिकारी सोपान अकेले, पं.स.सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. लोहारा नगरपंचायतचे ध्वजारोहण मुख्याधिकारी गजानन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिपक मुळे, माजी नगरसेवक आरीफ खाणापुरे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, यांच्यासह अधिकारी कर्मचारी, माजी नगरसेवक, नागरिक उपस्थित होते. पोलिस ठाण्याचे ध्वजारोहण पो.नि. धरमसिंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक वाठोरे, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. लोहारा तालुका कृषी कार्यालयाचे ध्वजारोहण तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लिमिटेड लोहारा खुर्द येथील ध्वजारोहण डॉ.हेमंत श्रीगिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जनरल मॅनेजर महेश कोनापुरे, असिस्टंट मॅनेजर व्यंकटेश वाघोलीकर, प्रशासकीय अधिकारी राजकुमार सगर, सुरक्षा अधिकारी पंकज पाटील, टाईम किपर अमोल हावळे, अंगद हराळे, दिपक कदम, राम पाटील, आदि, उपस्थित होते. लोहारा लोकवाचनालय येथील ध्वजारोहण माजी नगरसेवक आयुब शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव माणिक तिगाडे, ग्रंथपाल संजय जेवळीकर, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, जिल्हा चिटणीस विजय महानुर, भाजपा माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, कल्याण ढगे, आदि, उपस्थित होते. शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय लोहारा येथील ध्वजारोहण प्राचार्य यु.व्हि.पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी एन. एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.विनोद आचार्य, डॉ.एस. व्ही. सोनवणे, प्रा.डॉ.पी.के गायकवाड, प्रा.डॉ.एस.एस. कदम, प्रा.डॉ.सोमवंशी, प्रा.ङी.एन.कोटरंगे , प्रा.आर.एस. धप्पाधुळे, प्रा.डॉ.आर.एम.सुर्यवंशी, प्रा.डॉ.सी.जी. कडेकर, प्रा.डॉ.बी.एस.राजोळे, प्रा.डॉ.पी.व्ही.माने , प्रा. एस.एन.बिराजदार, प्रा.डी.व्ही.बंगले, बालाजी सगर, डॉ. शिरीष देशमुख, नंदकिशोर माने, प्रविण पाटील, परमेश्रर कदम, प्रकाश राठोड, संजय फुगटे, विद्यार्थी, उपस्थित होते.


 
Top