उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सद्य परस्थित पावसाने ओढ दिल्याने संपूर्ण खरिप पिके तसेच ऊस व इतर फळबागांना जोपासण्यासाठी शेतकरी मोठ्या अडचणीत येत असल्याचे शेतकऱ्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांच्याकडे खंत व्यक्त केली होती त्या अनुषंगाने खासदार ओमराजे यांनी दि.11 ऑगस्ट 2021 रोजी कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग क्र.01, सिंचन विभाग, लातूर यांच्याकडे व दि.14 ऑगस्ट रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री  अमित  देशमुख  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन आढावा बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता. या तात्काळ पाणी सोडण्याबाबत केलेल्या पाठपुराव्यास खासदार ओमराजे यांना यश आले आहे.

त्यानुसार आज दि.15 ऑगस्ट रोजी निम्न तेरणा #माकणी येथे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून 3.04 घमी/ से ने पाणी विसर्ग चालू केला आहे. या सोडण्यात आलेल्या पाणी औसा, निलंगा, लोहारा व उमरगा तालुक्यातील निम्न तेरणा प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्या शेजारील शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांच्या वतीने खासदार ओमराजे यांनी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री  अमित   देशमुख  , लातूर लघु पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता श्री म्हेत्रे, कार्यकारी अभियंता श्री जगताप आदींचे मन:पुर्वक आभार मानले.

 यावेळी उमरगा लोहारा मतदारसंघाचे आ.ज्ञानराज चौगुले साहेब, औसा विधानसभा मतदारसंघाचे अभिमन्यू पवार साहेब, प्रा.भीमाशंकर राचट्टे, लातूर लघु पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. म्हेत्रे, कार्यकारी अभियंता श्री जगताप, शिवसेना लोहारा तालुका प्रमुख मोहन पनुरे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top