उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

अकोला येथे प्रहारचे संस्थापक राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाची विदर्भ, मराठवाडा बैठक संपन्न झालीयावेळी नवंनियुक्त प्रदेशादयक्ष अनील भाऊ गावंडे,राज्यकार्यअध्यक्ष बल्लू भाऊ जवंजाळ, मंगेश भाऊ देशमुख,राज्य समन्वयक पुरुषोत्तम भाऊ आवारे व संघटनेतील सहकारी उपस्थित होते. याबैठकीस उस्मानाबाद येथून निमंत्रित असणारे सयाजी दादा देशमुख ,बाळासाहेब पाटील (मयुर काकडे यांचे प्रतिनिधी)राचय्या स्वामी व इतर अधिकृत पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत उस्मानाबाद जिल्ह्यात प्रहारच्या वतीने येणाऱ्या काळात विशेष नोंदणी मोहीम श्री मयुर काकडे व सयाजी देशमुख यांच्या नेतृत्वात राबिवण्यात यावी असे आदेश पक्ष श्रेष्ठीच्या वतीने देण्यात आले तरी या आदेशानुसार 10 ऑगस्ट पासून विशेष नोंदणी अभियान परांडा येथुन होणार असुन सर्व बच्चू भाऊ प्रेमीनी आपला उस्फुर्त सहभाग या नोंदणीमध्ये दाखवावा असे आव्हान मयुर काकडे व सयाजी देशमुख यांनी केले आहे


 
Top