उमरगा / प्रतिनिधी-

उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑगस्ट महिना उजाडला तरी पुस्तकाचे वाटप झाले नाही. आधीच शाळेच्या टाळा बंदी मुळे विद्यार्थी शिक्षणापासून कोसो दूर जात आहेत ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 हजार 976 तर  खाजगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 हजार 502 असे  एकूण 29 हजार 478 पुस्तकाचीं मागणी करण्यात आली आहे मात्र ठेकेदार यांच्या कडून वेळेवर पुस्तकाचा पूरवठा केला जातं नसल्याने विद्यार्थ्यांना  पुस्तका आभावी  अभ्यासापासून वंचीत राहावे लागत आहे.

ऑनलाईन च्या जमान्यात वाचन सस्कृती लोप पावत असल्याची ओरड होत आहे त्यातच लॉकडाऊनचीं भर पडल्याने शाळा महाविद्यालये बंद असून अभ्यास चालू आहे ज्याच्या कडे ऑनराइड फोन  आहे त्याची शिक्षण घेण्यासाठी धडपड चालू आहे. त्यातच ऐन क्लास वेळी रेंज येत नसल्याने शिक्षक काय शिकवतात हे विद्यार्थ्यांना कळत नाही विद्यार्थी व शुक्षकांचा संपर्क तुटतं असल्यामुळे विद्यार्थी ओरड करीत असतात. ज्या घरात दोन किंवा तीन विद्यार्थी आहेत अश्या पालकांना तीन तीन मोबाईल घेणे परवडणारे नसल्याने ही मोठी पचायत झाली आहे हातात पुस्तके असल्यामुळे विद्यार्थी अथवा पालक त्याच्या कडून अभ्यास करवून तरी घेतात मात्र पुस्तके उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी यांचे अभ्यासातील लक्ष दूर होत चालले आहे किमान वाचन ही झाले तरी विद्यार्थी अभ्यास करीत आहेत असा समज पालकांचा होतो. तालुक्यातील शाळेत असलेले जुने पुस्तके पुन्हा गोळा करून विद्यार्थ्यांना वाटप केले असल्याचा आव शिक्षक आणत असले तरी ही सर्व पुस्तके सुस्तितीत असतील असे सांगता येत नाही.

 

शाळेतून अद्यापणाचे काम नियमित चालू आहे जुने पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप केले आहेत त्यावर अभ्यास घेतला जातं आहे. ऑनलाईन शिक्षणात स्वाध्याय उपक्रमा अंतर्गत ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाचे माध्यमातून शिक्षण दिले जात आहे शिवाय फ्री कोर्स अंतर्गत मागील वर्षात झालेल्या अभ्यासक्रमाचीं पुनरावृत्ती घेण्याचे  करण्याचे काम चालू आहे.एकंदरीत विद्यार्थी व पालकांना समाधान वाटतं आहे.

  वैभव कांबळे- शिक्षक सुंदरवाडी


उमरगा तालुक्यातील विद्यार्थी संख्येप्रमाणे पुस्तकाची मागणी करण्यात आली आहे सदर पुस्तके वाटप करण्याचे काम एका खाजगी एजन्सी ला देण्यात आले असून त्यानी काही ठिकाणी पुस्तके पोंचं केले आहेत आपल्याकडे पण काही दिवसात पुस्तके पोचतील आणि ते तात्काळ विद्यार्थ्यांना वाटप केले जातील.

     शिवकुमार बिराजदार-गटशिक्षणाधिकारी उमरगा


 
Top