उस्मानाबाद / प्रतिनिधी-

प्रस्तावित केलेल्या गावांचे संयुक्त मोजणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीसाठी रेल्वे विभागाने तात्काळ वरिष्ठ विभागाकडे मागणी करावी, असे निर्देश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले. 

उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाईन मार्गासंदर्भात रेल्वे विभागाचे अधिकारी, महसूल विभाग व उस्मानाबाद -सोलापूर जिल्ह्याचे भूसंपादन अधिकारी यांची प्रति महिना खासदार ओमराजे निंबाळकर आढावा बैठक आयोजित करून रेल्वे मार्गाबाबत आढावा घेतात. 

 दि. 23 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,  उस्मानाबाद  येथे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. सदरील बैठकीत मागील बैठकीत दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने चर्चा झाली. सदरील रेल्वे मार्ग हा उस्मानाबाद तालुक्यातील 9 गावातून, तुळजापूर तालुक्यातील 15 गावातून, व सोलापूर तालुक्यातील 9 गावातून जातो. या सर्व रेल्वे मार्गात येणाऱ्या गावांचे सर्वेक्षण व मोजणीचे गावनिहाय प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना मागील महिन्याच्या आढावा बैठकीत दिल्या होत्या. त्या अनुषंगाने रेल्वे विभागाने महसूल विभागाकडे 30 गावांचे प्रत्यक्ष संयुक्त मोजणी साठी चे प्रस्ताव दाखल केले असून केवळ तीन गावचे प्रस्ताव बाकी असून ते 10 सप्टेंबरपर्यंत दाखल करावे असे निर्देश खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बैठकीत दिले.

 प्रस्ताव दाखल केलेल्या गावांची संयुक्त मोजणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची रेल्वे विभागाने त्यांच्या वरिष्ठ विभागाकडे मागणी करावी अशा सूचना केल्या. तसेच पहिल्या टप्प्यात सरकारी संयुक्त मोजणी करावी व दुसऱ्या टप्प्यात खाजगी मोजणी करण्यास सांगितले. उर्वरित तीन गावचे सुधारित देणार Demarcation 30 दिवसात रेल्वे विभागाने पूर्ण करून व या गावांचे देखील मोजणीचे प्रस्ताव महसूल विभागाकडे द्यावे अशा सूचना मा. खासदार ओमराजे यांनी केल्या.

 या बैठकीस कळंब-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे-पाटील नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती.रुपाली आवळे मॅडम, भूसंपादन उस्मानाबादच चे समन्वयक राजकुमार माने, भूसंपादन सोलापूर च्या समन्वयक श्रीमती गायकवाड मॅडम, SLR श्रीमती लोंढे मॅडम, मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे सहाय्यक अभियंता राजनारायण, भूमी अभिलेख उस्मानाबाद चे उपअधीक्षक अशोक माने, उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 
Top