उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवसेना व युवासेनेच्या वतीने उस्मानाबाद शहरातील शिवाजी चौकात नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यानंतर हि जर नारायण राणे यांची जीभ घसरली तर तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा याप्रसंगी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी मंगळवार दि. २४ ऑगस्ट रोजी दिला. 

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजय सस्ते,शिवसेना तालुका प्रमुख सतिश सोमाणी,जिल्हाप्रमुख युवा सेना अक्षय ढोबळे,नगरसेवक सोमनाथ गुरव,बाळासाहेब काकडे,राणा बनसोडे,कक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख गोईन पठाण, माजी शहरप्रमुुख पिंटु कोकाटे,युवा सेना तालुकाप्रमुख वैभव वीर,युवा सेना उपजिल्हा प्रमुख विजय राठोड,उपशहरप्रमुख बापु साळुंखे,विजय ढोणे,विभाग प्रमुख धनंजय इंगळे,आबा सारडे,अमोल मुळे,पंकज पाटील,रवि कोरे आळणीकर,भिमा जाधव,अभिजित देशमुख,बंडु आदरकर,महेश लिमहे,दिपक पवार,सत्यजित पडवळ,व्यंकट गुंड,पोपट खरात,विष्णु ढवळ आदींसह शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.  

 

 
Top