परंडा / प्रतिनिधी : -

 तालुक्यातील हिंगणगाव ( खु.) येथील शेतकरी कांतीलाल औसरे यांच्या संकरीत गाईच्या अंगावर वीज कोसळून गाईचा मृत्यू झाला होता.मृत्यू गाई चा तलाठी यांनी पंचनामा केला तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांचा पोष्टमार्टम पंचनामा रिपोर्ट येथील तहसिल कार्यालयात दाखल करण्यात आला होता.या अहवालाची दखल घेत तहसिल कार्यालयाने नैसर्गिक अपत्ती योजनेतून शेतकरी औसरे यांना नुकसान पोटी प्रभारी तहसिलदार सुजित वाबळे यांच्या हस्ते ३० हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला.

 यावेळी हरिचंद्र मुळे, नगरसेवक रत्नकांत शिंदे, हरिभाऊ सुकळे उपस्थित होते.


 
Top