परंडा / प्रतिनिधी : -

परंडा येथील भारतीय स्टेट बँक शाखा परंडा अंतर्गत ग्राहक संवाद दिन साजरा करण्यात आला.यावेळी बॅंक मॅनेजर निलेश निवृत्ती बोंबले यांनी बॅंक खातेदार यांना बॅंक संलग्न नवीन लाईफ ईन्शुरन्स विषयी माहिती दिली.

यामध्ये हेल्थइंशुरन्स १२००/- रुपये मध्ये १ लाख, फॅमिलीसाठी १०५००/- रुपये मध्ये ३ लाख तसेच डेथ इंशुरन्स करीता वार्षिक २०० रुपये साठी ४ लाख, ५००/- साठी १० लाख व १०००/- रुपये साठी २० लाख असून या योजनेचा लाभ ग्राहकांनीअवश्य घ्यावा. तसेच सर्व्हिस मॅनेजर आर.एस.शिर्के यांनी ही ग्राहकांशी महत्त्वपूर्ण संवाद साधला यावेळी उपस्थित उमेद चे लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, उद्योजक सागर गवारे, उद्योजक युवराज खैरे, अकबर तांबोळी, फिल्डआॅफिसर  गुप्ता, फिल्डआॅफिसर अभयसिंह मोहिते,असिस्टंट ए.व्ही.सहस्ञबुद्धे, बुरंडे महाराज, मेजर भुसारे, समन्वयक महेश पाटील, गजू आगरकर, राजू हजारे, देशमुख आदि उपस्थित होते.


 
Top