वाशी  / प्रतिनिधी 

 तहसील कार्यालयाच्या क्वार्टर व गावातील चांभारवाडा येथिल घरात प्रवेश करून लाखो रुपयाचे ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केलेला आहे . पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , वाशी तहसील कार्यालयच्या आवारात कर्मचाऱ्याला राहण्यासाठी क्वार्टर आहे . त्या ठिकाणी व चांभारवडा येथे ( दिनांक 12 ) रोजी पहाटेच्या ३ वाजेच्या सुमारास चोरीची घटना घडलेली आहे . तहसीलच्या आवारात क्वार्टर मध्ये गजानन स्वामी यांच्या घराचा दरवाजा चोरट्याने लोखंडी रॉडने उघडत असताना गजानन स्वामी यांनी दरवाजा रोखून धरला होता . माञ दरवाज्याला चोरट्याने जोराने ढकलून आत प्रवेश केला यावेळी ६जन चोरट्याच्या हातात कोयते ,चाकू, लोखंडी गज ,मोठे लाकडी दांडके होते . यावेळी गजानन स्वामी यांच्या आईस चोरट्याने मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील चार तोळे सोने काढून घेतले तसेच गजानन स्वामी यांना चाकूचा धाक दाखवून जीव मारण्याची धमकी देत त्यांना मारहाण करण्यात आली त्यांच्या डोक्याला मार लागला आहे .त्यावेळी चोरट्याने कपाटामध्ये असणारे सोने व इतर रोख रक्कम तसेच पत्नीच्या गळ्यातील सोने व खिशात असणारी रोख रक्कम असा एकूण ४लाख ९ हजार ५०० रुपये ऐवज अज्ञात चोरट्याने पसार केला आहे . त्याच रात्री शहरातील चांभारवाडा येथे गणेश ननवरे यांच्या घरात प्रवेश करून त्याठिकाणीही चोरी करण्यात आली घरात प्रवेश केल्यावर गणेश नन्नवरे यांनी माझ्या घरात वृद्ध आई-वडील आहेत तेव्हा आम्हाला कोणालाही मारहाण  करू नका तुम्हाला काय घेऊन जायचे आहे ते घेऊन जा म्हणाले तेव्हा चोरट्याने त्यांच्या घरातील एकूण ८८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला . या घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक चौरे यांनी घटनास्थळाला तात्काळ भेट दिली .  तसेच श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केले मात्र श्वानला चोराचा माग लागला नाही . तसेच या घटनेची माहिती मिळताच उस्मानाबाद पोलिस अधीक्षक राज तिलक रोशन यांनी घटनास्थळाला व पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली .व त्यानी तपास चक्र फिरवली .

 वाशी शहरात गेल्या अनेक महिन्यापासून चोरीचे सत्र सारखे चालू असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

 
Top