उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत उस्मानाबादेत शुक्रवार दि. १३ ऑगस्ट रोजी आल्यानंतर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठात रूपांतर करण्याची मागणी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, सिनेट मेंबर संजय निंबाळकर,नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली केली आहे. 

उस्मानाबाद येथील विद्यापीठाच्या उपकेंद्रात १० विभाग सुरू असून ६० एकर मध्ये मास्टर प्लॉननुसार वेगवेगळे करोडो रुपयांचे बांधकाम सुरू आहे. या उपकेंद्रात पाच कोटी रुपयांची स्वतंत्र प्रशासकीय इमारत त्याच प्रमाणे सात कोटी रुपयाचे स्वतंत्र विज्ञान भवन साडेआठ कोटीचे सर्वसोनीयुक्त शंभर मुलींचे वस्तीगृह, एक कोटीचे संचालक यांचे निवासस्थान, सहा कोटीचे मुलांचे वसतीगृह, एक कोटीचे उपहार गृह, सव्वादोन कोटी अथितीगृह त्याचप्रमाणे ई-ग्रथालय, ५० लाखाचे क्रिडागण, नवीन ग्रथालय बांधकामाचे साडेसात कोटीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठात लवकरात लवकर सुरू करावे, अशी मांगणी सर्वपक्षीयांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी राजेंद्र शेरखाने, सुरज साळुंखे, अॅड.के.एस.चौरे,नानासाहेब जगदाडे, दिलीप जावळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.  

 
Top