उस्मानाबाद / प्रतिनिधी-

श्री सद्गुरू ब्रम्हचारी रामानंद महाराज यांच्या १०२ व्या समाधी उत्सवानिमित्त उस्मानाबाद तालुक्यातील काजळा येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास शुक्रवारी (दि.१३) विधीवत प्रारंभ झाला आहे.

कलश पूजन सरपंच प्रविण पाटील, विणा पूजन उपसरपंच चंद्रकात मडके, श्री दत्त मुर्ती पूजन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, टाळ मृदंग पूजन पांडुरंग खोचरे, तुकाराम गाथा पूजन भगवान पाटील, श्रींच्या समाधीचे पूजन प्रदीप शेळके व अप्पा हाजगुडे, ध्वज पूजन विजयदत्त पाटील, गुरूचरित्र, सद्गुरू चरित्र लिलामृत पूजन विष्णूदास आहेर, ज्ञानेश्वर महाराज मुर्ती पूजा राजुळ पवार, तुकाराम महाराज मुर्ती पुजा रामेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री सद्गगुरू रामानंद महाराज देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप शेळके, उपाध्यक्ष उमेश पवार, सचिव किशोर मसे, प्रकाश देशपांडे, रामेश्वर हाजगुडे, अण्णासाहेब खडके, राजेश हाजगुडे, हभप आकाश महाराज मगर, ऋषीकेश महाराज जोशी, मधुसुदन महाराज पाटील, सुदर्शन महाराज साखरे, अनिकेत महाराज माळी, अमर महाराज पडूळकर, अंकुश महाराज हेबळे, शिवाजी हाजगुडे, भास्कर पवार, अरविंद माळी, रामकृष्ण मडके आदींसह भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.

सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रम

यावेळी सप्ताह सोहळ्यानिमित्त पहाटे ४ ते ६ काकडा भजन, स. ७ ते ९ या वेळेत पारायण, स. १० ते २ गाथा भजन, दु. १ ते ४ महिला भजन, सायं. ५ते ६ हरिपाठ, रात्री ८ ते १० हरिकीर्तन तर १२ ते पहाटे ४ या वेळेत हरीजागरचा कार्यक्रम होणार आहे.

या महाराजांची कीर्तन सेवा

शुक्रवारी हभप हभप भिमराव आवटे यांची कीर्तन सेवा झाली. तर शनिवारी (दि.१४) हभप मुकुंद देवगिरे, रविवारी (दि.१५) हभप नवनाथ सिरसट, सोमवारी (दि.१६) हभप योगेश इंगळे, मंगळवारी (दि.१७) हभप राम पांचाळ, बुधवारी (दि.१८) हभप आकाश मगर महाराज यांचे किर्तन दु. २ ते ५ या वेळेत तर हभप नवनाथ चिखलीकर महाराज यांचे गुरूवारी (दि.१९)दु. २ ते ४ या वेळेत काल्याचे कीर्तन होणार आहे.


 
Top