तुळजापूर / प्रतिनिधी-

स्वातंत्र्य दिनानिमित्ताने भवानी  प्रतिष्ठान व  शिवशंभु ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.१२ रोजी आयोजित  रक्तदान शिबिरात ७१ रक्तदात्यांनी  रक्तदान केले.या शिबीराचे उदघाटन  युवा नेते  विनोद गंगणे यांच्या हस्ते करण्यात आले . प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सचिन  रोचकरी यांची उपस्थिती होती.

 यावेळी युवा नेते माऊली राजे भोसले ,आनंद   कंदले,बाळासाहेब भोसले,सचिन कदम,अभीजित साळुंके,रत्नदिप भोसले,दिनेश बागल यांची उपस्थिती होती.प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  शशिकांत नवले यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिरात  ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले, रक्तदात्यास प्रतिष्ठान तर्फे भेटस्वरुपात  सेफ्टी हेलमेट  देण्यात आले. यावेळी बाळासाहेब पेंदे, धिरज कदम भैय्ये, आकाश चोपदार,धनाजी घोगरे,विकास सोंजी,धिरज चोपदार, विनायक सिरसट, सुरज चोपदार, पंकज पेंदे,प्रज्वल भोसले,विकास चोपदार यांची उपस्थिती होती

 
Top