उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात जो काही नवीन इमारत व इतर कामावर होणारा खर्च हा डाँ. बाबासाहेब  आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्व:निधीतून खर्च होत आहे. यासाठी आपण निधी मिळविण्यासाठीय प्रयत्न केला, असे राष्ट्रवादीचे नेते व सिनेट सदस्य संजय निंबाळकर यांनी सांगितले. दरम्यान या बाबत भाजपानी आपली भुमिका स्पष्ट  करत 3आमदार ,1खासदार देणाऱ्या  जिल्हावासीयांची पुर्ण विद्यापीठाची  अपेक्षा  पुर्ण करावी असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी व्यक्त केले

उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत १३ ऑगस्ट रोजी उस्मानाबादेत येत आहेत. उस्मानाबाद येथील विद्यापीठ उपकेंद्रास १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटल्यामुळे या उपकेंद्राचे पुर्णविद्यापीठात रूपांतर व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून आहे. या बाबत संजय निंबाळकर यांनी सांगितले की, आपण बऱ्याचदा पुर्ण विद्यापीठाबाबत पाठपुुरावा केला. परंतु मंत्री उदासीन आहेत. कांहीतरी निमित्त सांगून विद्यापीठ प्रश्नी राजकारण केले जात आहे. पुर्ण विद्यापीठासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत. त्यापैकी ७५ टक्के बाबी पुर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पुर्ण विद्यापीठाची घोषणा झाल्यास १० ते १५ कोटी रुपये खर्च येईल. कोल्हापूर येथील  शिवाजी विद्यापीठाचे विभाजन होऊन सोलापूर येथे नव्याने विद्यापीठ झाले. मग डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करण्यास मंत्री का घाबरत आहेत ? असा प्रश्न ही निंबाळकर यांनी उपस्थित केला.                   

 भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पुर्ण विद्यापीठ  होण्यासाठी मंञी सामंत यानी जी समिती नेमली होती त्या बाबत स्पष्टीकरण  देणे आवश्यक आहे या समितीने नेमके काय काम केले याचीपण माहीती देणे आवश्यक  असल्याचे काळे यांनी सांगितलं 


 
Top