तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील बोळेगाव व कुन्सावळी येथील युवकांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गुरुवार दि. १२ रोजी प्रवेश केला. सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढण्याची ताकद फक्त मनसेतच असल्याने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आपण सर्वजण प्रवेश करित असल्याचे  बोळेगाव व कुन्सावळी येथील युवकांनी   सांगितले. 

यावेळी लखन पाटील, राम काळे,लक्ष्मण रूपनूर,दिपक पाटील, आंबादास हळणूरे, ज्ञानेश्वर रूपनूर,धुळबा कोकरे,नरसिंग रूपनूर,दत्ता माने,कुंडलिक देडे, संदीप शिंदे यांच्यासह अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला. या कार्यक्रमास मनसेचे मल्लिकार्जून कुंभार उपस्थित होते.

 
Top