तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर शहरासह परिसरात नागपंचमी सण शुक्रवार दि. १३ रोजी नगदेवतेचे पुजन करुन पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात आला. नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर शिवारातील नागदेवतेच्या मंदीरात भाविक भक्तांनी   गर्दी केली होती.

श्री तुळजाभवानी मंदीरातील होमकुंडासमोर सकाळी पितळेच्या नागदेवतेच्या फड्याची  विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली होती.माञ कोरोना पार्श्वभूमीवर मंदीर बंद असल्याने दर्शनार्थ गर्दी झाली नाही .तालुक्यात काही गावांनमध्ये नागदेवतेची पुजा करण्यात आली.

राज्यात बहुचर्चित असलेल्या सावरगाव येथील नागपंचमी दिनी भरणारी याञा यंदा मोजक्याच सेवेदारी मानकरी मंडळीच्या उपस्थितीत धार्मिक विधी होवून,साधेपणाने साजरी करण्यात आली. 

 
Top