उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

रुपामाता मल्टिस्टेट को ऑपरेटीव्ह सोसायटीच्या बेंबळी शाखेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष ऍड.व्यंकटराव गुंड व बेंबळी गावच्या सरपंच वंदनाताई नवनाथ कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पं. स. सभापती बालाजी गावडे,जी. प.सदस्य ज्ञानदेव राजगुरू , गोपाळराव नळेगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चेअरमन ऍड. व्यंकटराव गुंड यांनी बेंबळी गावातील नागरिकांना संस्थेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी देण्याची विनंती केली,तसेच रुपमाता दुध प्रक्रिया संस्था,रुपामाता गुळ पावडर या संस्थेने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे कार्य केल्याचे सांगितले त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आपला शेतमाल घाईघाईने विक्री करण्यापेक्षा रुपामाता वेअर हाऊस मध्ये ठेवावा त्यांना त्याबदल्यात तात्काळ धान्य तारण योजनेतून कर्ज पुरवठा करण्यात येईल अशी माहिती दिली.

संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी पांडुरंग पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला उद्योजक संजय पटवारी,ह.भ.प.बाबुराव पुजारी,जि. प.चे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी ,बेंबळी विकास सोसायटीचे चेअरमन सोमनाथ गवळी,सत्तार शेख,प्रकाश शेळके,भास्कर बोंदर, विद्या माने,मरगणे गुरुजी,जयसिंह व्हन्सनाळे,रुपामाता मल्टिस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर, व्यवस्थापक सचिन सोनटक्के, योगेश खराडे,गोपाळ जंगाले, प्रमोद शेळके,सागर जगताप,संभाजी कुंभार यांच्यासह संस्थेचे संचालक,नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू शेख सर यांनी केले.


 
Top