उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

  येथील सिद्धार्थ कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ,गोरे कॉप्लेक्स समतानगर,उस्मानबाद येथे 

मुप्टा संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक अयोजित करण्यात आली होती.

यावेळी प्रा.रवि सुरवसे यांची  जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. “के.जी.टू.पी.जी” शिक्षकांच्या न्याय,हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून या संघटनेचा नावलौकिक आहे .यावेळी संघटनेचे नेते,संस्थापक सचिव बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट मेंबर प्रा.डाँ.सुनिल मगरे सर यांचे  प्रमुख मार्गदर्शन झाले. संघटनेचे अध्यक्ष प्रा.डाँ.संभाजी वाघमारे,बीडचे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे,मुप्टा उर्दू विभागाचे राज्य सचिव मा शाहेद कादरी,राज्यअध्यक्ष प्रा.समिउल्लाखान ,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.हर्षवर्धन कोल्हापुरे ,प्राप्रदीप सूर्यवंशी,प्रा.सुनिल जाधव यांनी संघटना बांधणीसाठी मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हासंघटक म्हणून प्राचार्य अंबादास कळासरे व महिला संघटक म्हणून ञिशाला चंदनशिवे यांची निवड करण्यात आली. उर्दू विभागाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून सय्यद अहेमद मसुद इनामदार यांची निवड करण्यात आली.

यावेळी प्रा.सुशिल सरवदे, प्रा.अरविंद खांडके,प्रा. महेद्र चंदनशिवे, प्रा.हनुमंत शेंडगे, प्रा.अविनाश कांबळे, शेख असिफ, प्रा. डाॅ. पंडित गायकवाड ,प्रा.राम चंदनशिवे प्रा. सहदेव रसाळ,गायकवाड ए,एस. प्रा.गायकवाड प्रदीप,कसबे परमेश्वर,प्रा.एल.व्ही.बुरगुंडे इ.मान्यवर उपस्थित होते. 

 
Top