काटी / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातील काटी तांडा ते नृसिंह तांडा या २ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी ०१.५३ रू. कोटी निधी प्राप्त झाला आहे. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतरस्त्याच्या कामासाठी १९ लक्ष रु. खर्च करण्यात येणार आहे.

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत काटी तांडा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता (०६ लक्ष रु.) व खुंटेवाडी तांडा येथेही सिमेंट काँक्रीट रस्त्याचे (०३ लक्ष रु.) काम पूर्ण होणार आहे. या योजनेतून तालुक्यातील तांड्यांवर दर्जेदार रस्ता असावा यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.  यावेळी तांड्यावरील नागरिकांनी पाणी पुरवठा, घरकुल, स्मशानभूमीबाबत विविध अडचणी मांडल्या. त्या अडचणी सोडवण्यासाठी व रस्त्याची कामे उत्तम दर्जाची व्हावीत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना अामदार राणा पाटील यांनी सूचना केल्या आहेत. 

गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पीक विम्याबाबत तक्रारी केल्या. त्यांच्या कोरड्या डोळ्यात पाहून काय उत्तर द्यावे हेच समजले नाही. आपण वारंवार विनंती, पत्रव्यवहार करूनही कृषिमंत्री, मुख्यमंत्री महोदय या विषयाकडे लक्ष देण्यास तयार नाही. मात्र शेतकरी बांधवांसाठी आपण हा लढा न्यायालयात लढत आहोत. पीकविमा मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील. वेळप्रसंगी आपण रस्त्यावर ही उतरू असा इशारा देण्यात आला. 

याप्रसंगी तालुकाध्यक्ष श्री.संतोष बोबडे, जिल्हा परिषद सदस्य श्री.राजकुमार पाटील, श्री.विक्रमसिंह देशमुख, पंचायत समिती सभापती सौ.रेणुकाताई इंगोले, उपसभापती श्री.दत्तात्रय शिंदे, श्री.यशवंत लोंढे, सरपंच श्री.खेलनाथ क्षीरसागर, उपसरपंच श्री.महादेव जाधव, ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख कार्यकर्ते, ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती.

 
Top