उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील एमआयडीसी भागात दि२० ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात शिवसैनिक बाळासाहेब  देशमुख (42) हे जागीच  ठार झाले तर शिवसेनेचे शहराध्यक्ष पप्पू उर्फ संजय मुंडे व सहकारी सूरज शिंदे हे जखमी झाले.जखमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  बाळासाहेब देशमुख यांच्या  पार्थिवावर कपिधार स्मशानभुमीत अत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे.  

 हे तिघे शिवसैनिक गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास  रेनो डस्टर कारने माजलगावकडे जात असताना, एमआयडीसी मध्ये असलेल्या उड्डाण पुलाखालील रस्त्याने बीड रस्त्याकडे न वळता चुकून एमआयडीसी रस्त्याला वळले. पुढे रस्ता संपल्याने कार आरटीओ ऑफिससमोर गाडी खड्ड्यात पडून  हा अपघात झाला आहे.

गाडीत सूरज शिंदे यांच्या बाजूला पप्पू उर्फ  संजय मुंडे बसले होते. पाठीमागे मध्यभागी बाळासाहेब देशमुख बसले होते. अपघातात मध्यभागी बसलेले बाळासाहेब देशमुख यांच्या डोक्याला मार लागल्याने ते जागीच ठार झाले तर सूरज शिंदे आणि पप्पू उर्फ संजय मुंडे किरकोळ जखमी झाले.  अपघातात मयत पावलेले बाळासाहेब देशमुख हे मूळ गौरचे असून, ते उस्मानाबाद शहरातील तांबरी भागात राहत होते. भाजप नेते सुधीर पाटील यांचे ते मावसभाऊ होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 
Top