उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कळंब शहर तसेच उस्मानाबाद जिल्ह्य़ातील निवासी अतिक्रमणे कायम करा, या मागणीसाठी महाराष्ट्र क्रांती सेना,लालपॅन्थर ताजखाॅ पठाण प्रतिष्ठान यांच्या वतिने  संयुक्त भव्य दिव्य मोर्चा काढून  सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

या मोर्चाचे नेतृत्व नेते ईश्वरभाऊ भालेराव, बजरंगभाई ताटे, माया शिंदे, ताजखान पठाण,यांनी केले.

या मोर्चाची सुरुवात तहसील कार्यालयातुन सुरु होऊन सरळ डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पुष्प अर्पण करून, बाजारपेठेतून उजविकडे सोनार गल्लीतुन, डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून डावीकडे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून थेट उपविभागीय अधिकारी अहिल्या गठाळ यांना विविध मागण्यांची निवेदन देण्यात आले या मोर्चामध्ये हजारो संख्येने गायरान धारक सामिल होते.

या मोर्चामध्ये विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच हनुमंत पाटोळे,बालाजी गायकवाड, पांडुरंग कदम,धनंजय ताटे,ज्येष्ठ नेते.रामकृष्ण कांबळे,मायाताई शिंदे,विश्वंभर वाघमारे,राजुबाई जाधव,सुभाष थोरात,महेषभाऊ बनसोडे, वसंतदादा देडे,शिवाजी थोरात, जयश्री कांबळे, बळीराम देवकुळे,बाळू शिंदे,पवन डोंगरे,समाधान डोंगरे यांनी भाषणे करुन सहभागी मोर्चाला संबोधित केले. 

 
Top