उमरगा  / प्रतिनिधी-

जेम्स प्रिंसेप यांनी 1837 मध्ये लावलेला धम्मलिपिचा शोध हा भाषा-लिपि इतिहासाबरोबरच बौध्दधम्माच्या इतिहासातील एक महान क्रांती असल्याचे मत आंबेडकरी चळवळ व बौध्द धम्म अभ्यासक सुधीर कांबळे यांनी व्यक्त केले.

 आंबेडकरी बौद्ध या माध्यम समुहाच्या वतीने धम्मलिपी गौरव दिनानिमित झूमद्वारे आयोजित विशेष ऑनलाइन व्याख्यानमालेत ते बोलत होते. भारतात टाकसाळीमध्ये अस्से मास्टर म्हणून कामास आलेल्या जेम्स प्रिंसेप याना जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटीचे संपादक करण्यात आल्यानंतर भारतातील प्राचीन नाण्याचा अभ्यास सुरु केला.नाण्यावरील अक्षरांचा अभ्यास करण्यामुळे त्याचा ओढ़ा लिपि आणि शिलालेख याकडे वाढला.शिलालेखाच्या अभ्यासातून अनेक शिलालेखाच्या शेवटी लिहिल्या गेलेल्या *दानं* या शब्दाचा शोध शोध लावला.

१८३७ मध्ये शिलालेखाच्या अभ्यासातून सम्राट अशोक आणि त्याच्या शिलालेखाची लिपि या दोन्हीचा शोध त्याने लावला.त्यामुळेच जगाला अशोक नावाचा सम्राट,त्याचे धम्मकार्य आणि बौद्ध धम्माचा समृद्ध मानवतावादी इतिहास माहित झाला.असेही ते पुढे म्हणाले.

 ▪मानवतावादी बौध्द तत्वज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी लवकरच तालुक्यातील किमान 50 जणांना धम्मलिपि शिकवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. यावेळी संयोजन समितिचे प्रा.महावीर कांबळे,प्रा.प्रणाली जाधव,डॉ. रवींद्र वायकर यांच्यासह शंभरहून अधिक प्राध्यापक-शिक्षक उपस्थित होते.


 
Top