उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टीचे उस्मानाबाद जिल्हयाचे नेते तथा तुळजापुर विधानसभा सदस्य आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या सुचनेनुसार भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी तालुक्यातील आंबेवाडी, बेंबळी, चिखली, दारफळ, अंबेहोळ, जुनोनी, वलगुड या गावातील शेती पिकांची पाहणी करत झालेल्या नुकसानीचा अंदाज घेत सरकारने तात्काळ नुकसान झालेल्या व होत असलेल्या शेती पिकांचे पंचनामे करावे अशा प्रकारचे निवेदन भारतीय जनता पार्टी उस्मानाबादच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद  येथे देण्यात आले व त्याचबरोबर सोयाबीन पिकांच्या सुकलेल्या, उन्हाने करपलेल्या आणि शेंगा लागत असतांना पावसाअभावी करपुन जात असलेल्या सोयाबीनच्या रोपांची जुडी सुध्दा निवेदना सोबत जिल्हाधिकारी यांना देण्यात आली.

 या प्रसंगी नेताजी पाटील, रामदास कोळगे, दत्ता देवळकर, नामदेव नायकल, नाना कदम, बालाजी फावडे, मोहनी खापरे, नवनाथ कांबळे, विजय शिंगाडे, तेजस सुरवसे, प्रसाद राजमाने, मार्तंड भोजने, सिध्देश्वर गवळी, गणेश येडके, अमोल पाटील, खंडेराव शिंदे, चोबे दुष्यंत तसेच धाराशिव तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नुकसानग्रस्त शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थीत होते.

 
Top