कळंब  / प्रतिनिधी-

मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना कळंब तहसिलदार रोहन शिंदे यांच्या मार्फत मातंग समाजाच्या विविध विषयाच्या मागण्यांचे निवेदन मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे यांच्या हस्ते देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,मातंग समाजाचा अद्यापही सर्वांगीण विकास झाला नसल्याने समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अ,ब,क,ड अरक्षण देण्यात यावे, साहित्याचे महामेरू,साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा,मातंग समाजातील कोरोणाने मृत्यु पावलेल्या व्यक्तिंना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांना ज्या प्रमाणे शासनाने योजना सुरू केली आहे,तशाच पद्धतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थिक विकास महामंडळास सदरील योजना सुरू करण्यात यावी,उस्मानाबाद व कळंब येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा उभा करण्यात यावा,बार्टी प्रमाणे आर्टी ची स्थापना करण्यात यावी,कळंब येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या चौकाचे सुशोभीकरण करण्यात यावे,मातंग समाजाला स्वतंत्र अ,ब,क,ड आरक्षण मिळावे म्हणून बीड जिल्ह्यातील साळेगाव येथील स्वर्गीय संजय ताकतोडे यांनी जलसमाधी घेतली होती, त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडुन १०लाख रुपयांची आर्थिक मदत व वारसाला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.या वेळी जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटुळे, जिल्हा सचिव बालाजी उपरे, तालुकाध्यक्ष धनंजय ताटे,सचीव बाळासाहेब कांबळे,तालुका संघटक दत्ता झोंबाडे,वाशी तालुका महीला अध्यक्षा सौ.आशा शिंदे,संघटक आशा माने, बालाजी शिंदे, आकाश लोंढे,करण मोरे, तिरुपती खंडागळे,शुभम अंगरखे,दिपक खंडागळे,अजय लोखंडे,उत्रेश्र्वर मस्के, विष्णु झोंबाडे, संतोष झोंबाडे, यांच्या सह पक्षाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top