परंडा / प्रतिनिधी : -

शिक्षक हिताचे विविध प्रलंबित प्रश्न निकाली काढून न्याय मिळावा या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले. निवेदनातील प्रत्येक विषयाला अनुसरून अगदी सकारात्मक चर्चा होऊन आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करू असे संघटनेला आश्वासित केले.

 निवेदनात म्हटले आहे की,पुरवणी देयके (फरक बीले) दीड वर्षापासून रखडून ठेवली असून आजतागायत अदा केली नाहीत.ती तात्काळ अदा करावीत, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके दोन वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत,बी.एस.सी.पात्र पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मंजूर करावी,प्राथमिक-माध्यमिक शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर करावी, शिक्षकांचे मासिक वेतन दरमहा विलंबाने होते.ते वेळेत करावे,त्रुटीतील ४२ शिक्षकांच्या त्रुटी पूर्ण करून घेऊन चटोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करावी,३० जून २०२० पर्यंत १२ वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरीष्ठ वेतन श्रेणीचा लाभ द्यावा, बिंदू नामावली अद्यावत करून दर्शनी भागावर लावावी,सन २०१९-२० व २०२०-०२१ च्या जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी जाहीर करून ५ सप्टेंबर शिक्षक दिनी संबंधित शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करावे, शिक्षकांना स्थायित्वाचे लाभ द्यावेत, संजीव पंडीत पाटील या शिक्षकाला रीट पिटिशन क्र.१४४८७/०१९ दि.०३/१२/०१९‌ उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे निर्णयानुसार आगाऊ दोन वेतनवाढी देऊन आदेश निर्गमित करावा या बाबींचा समावेश आहे.

यावेळी प्रहार शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना राज्य प्रवक्ते दत्तात्रय पुरी, जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, कार्याध्यक्ष विशाल अंधारे, कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, जिल्हा नेते संतूक कडमपल्ले, जिल्हा प्रवक्ता धनंजय आंधळे, कळंब तालुका संपर्क प्रमुख गोविंद तापडे आदि.पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top