उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 लोहारा, उमरगा, उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्यातील सुमारे चार हजार शेतकऱ्यांच्या शेतात पवनचक्कीतून निर्माण होणाऱ्या विजेचे वहन करण्यासाठी खांब बसवण्यात आले आहेत. मात्र, अनेक शेतकऱ्यांना अद्यापही याचा मोबादला देण्यात आलेला नाही. वारंवार यासंदर्भात निवेदने देऊनही दखल घेतली जात नसल्यामुळे आता शेतकरी आक्रमक झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दि. २ सप्टेंबरला खांब उखडून टाकण्याचे आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अॅड. आशिष पाटील यांच्यासह विविध शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सांगितल्या. ते म्हणाले की, सिमेंस गमेशा पवनचक्की कपंनी व सुयोग उर्जा या कंपन्यांनी शेतकऱ्यांची एका प्रकारे फसवणकू केली आहे. कंपनीने शेतकऱ्यांची कसलीही परवानगी न घेता बनावट कागदपत्रे तयार करून तसेच पैसे देतो म्हणून शेतात विद्युत खांब रोवले आहेत. याच्या माध्यमातून पवनचक्कीतून निर्माण झालेल्या विजेचे वहन केले जात आहे. याबाबत जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांना मारहाणही केली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यावेळी पोलिस व महसूल प्रशासनाने आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, अद्यापही यासंदर्भात काहीही कारवाई झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांचा संयम बिघडत आहे. २ सप्टेंबरपर्यंत यासंदर्भात काही कारवाई न झाल्यास खांब उखडून टाकण्यात येतील, असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.

विद्युत खांब रोवले आहेत. याच्या माध्यमातून पवनचक्कीतून निर्माण झालेल्या विजेचे वहन केले जात आहे. याबाबत जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांना मारहाणही केली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यावेळी पोलिस व महसूल प्रशासनाने आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, अद्यापही यासंदर्भात काहीही कारवाई झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांचा संयम बिघडत आहे. २ सप्टेंबरपर्यंत यासंदर्भात काही कारवाई न झाल्यास खांब उखडून टाकण्यात येतील, असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.


 
Top