परंडा / प्रतिनिधी : - 

परंडा तालुक्यातील अनाळा येथील सोने चांदी चे व्यापारी विनोद अशोक चिंतामणी यांची सर्व शाखीय सोनार युवा सेना मराठवाडा प्रमुख पदी निवड करण्यात आली . दि.० ३ रोजी अहमदनगर येथे सर्व शाखीय सोनार युवा सेना पदाधिकारी राज्यस्तरीय मेळावा संपन्न झाला. 

या मेळाव्यात त्यांना निवडी चे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष योगेश शहाणे यांच्या हस्ते देण्यात आले . विनोद चिंतामणी यांची काम करण्याची पद्धत  , समाजाविषयी असलेली तळमळ, संघटना वाढीसाठी केलेले कार्य याची दखल घेऊन त्यांच्यावर मराठवाडा प्रमुख म्हणून निवडी चे पत्र देण्यात आले . मेळावा अध्यक्षस्थानी सुधाकरराव टाक , प्रमुख पाहुणे म्हणून मा. महापौर कैलाससेठ भांबुर्डेकर , उद्योजक मधुकरराव टाक , सुहास बार्शीकर , ग्रामिण संघटनेचे मधुकरराव मैंड , पोलखोल संपादक भगवान शहाणे , लाड सोनार ट्रस्ट अहमदनगरचे संजय देवळालीकर , शरद कुलथे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष योगेश शहाणे , संतोष वर्मा , महिला सल्लागार रेखाताई नवसे ,रवी माळवे , प्रशांत टाक , अनिल उंबरकर , जगदिश काजळे , दिपक डहाळे , झानेश्वर बागडे आदिंनी परिश्रम घेतले. आभार संस्थापक अध्यक्ष योगेश शहाणे यांनी मानले.


 
Top