वाशी / प्रतिनिधी

 जागतिक मौखिक दिवसाच्या सप्ताह निमित्ताने मा.उपसंचालक डॉ. एकनाथ माले सर मा.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली  दि 05 आँगस्ट 2021 रोजी ग्रामीण रुग्णालय वाशी येथे मौखिक आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

 या शिबिरात मा.वैद्यकीय अधिक्षक डॉ. कपिलदेव पाटील  यांनी उपस्थित रुग्णांना मौखिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी व्यसनापासून दुर राहण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच लवकर मौखिक आरोग्य तपासणी केल्यास कँन्सर पासून वाचता येईल त्याकरिता व्यसन करू नये ,व्यसन असेल तर लवकरच बंद करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, यावेळी डॉ. सोनाली गाढवे ,दंत शल्यचिकित्सक यांनी ओपीडी मध्ये येणाऱ्या एकुण 26 रुग्णांची मौखिक आरोग्य तपासणी केली. यावेळेस आरोग्य पर्यवेक्षक श्री. पद्माकर कोठावळे उपस्थित होते.


 
Top