तुळजापूर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हयातील लोहारा येथील शेतीचा बोगस पंचनामा करून शासनाची व शेतकरी यांची फसवणूक करणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा उपोषण  करण्याचा इशारा स्वाभिमानीशेतकरी संघटनने   जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

   मौजे लोहारा येथील शेतकरी श्री . अविनाश अशोक सोमवंशी यांच्या शेतामध्ये गट नंबर 195 बाजूच्या 196 दक्षिण बाजू 197 पश्चिम मधील शेतकऱ्यांनी पावसाचे पाणी बांध फोडून सोडत आहे त्यामुळे वस्तुनिष्ठ पंचनामा करावा गट नंबर 197 चा पंचनामा तलाठी व मंडळ अधिकारी यांनी संगनमत करून बनावट केला आहे 197 मधील शेतकऱ्याने पावसाचे पाणी वर नमुद शेतकऱ्याच्या शेताकडे नैसर्गिक प्रवाह असल्याचे दाखवून खोट्या सह्या घेऊन सज्जावर बसून पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी केला आहे . सदर पंचनामा हा संबंधित शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन करणे अपेक्षित असताना या ठिकाणी मात्र तलाठी व मंडळ अधिकारी यांनी सज्जावर केला आहे . त्यामध्ये संबंधीत शेतकऱ्याची खोटी सही करून शेतकरी पंचनामा करत असताना उपस्थित होते,असे दाखवले आहे.

तरी या सर्व गोष्टीची दखल घेऊन त्यांच्यावर शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल चौकशी करून संबंधीत अधिकारी यांना निलंबित करावे या बाबतीत 25/8/2021 पर्यंत कारवाई झाली नाही तर संबंधीत शेतकऱ्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण बसणार आहोत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हााध्यक्ष , रविंद्र भिमाशंकर इंगळे यांनी दिला आहे. 

 
Top