तुळजापूर / प्रतिनिधी-
कर्तव्यदक्ष गृहम़ञी तथा माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर, आर (आबा) पाटील यांच्या ६४ व्या जयंतीचे औचित्य सोमवार दि.१६ आँगष्ट सोमवार रोजी आर, आर (आबा) पाटील विचार मंच तुळजापुर व तुळजापुर तालुका पञकार संघाच्या वतीने श्री तुळजा भवानी मातेच्या मंदीर परिसरात प्रथम स्वर्गीय आर आर (आबा) पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन उस्मानाबाद जिल्हा पञकार संघाचे जिल्हाउपाध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या हस्ते तालुका पञकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रदीप अमृतराव यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी पञकार ज्ञानेश्वर गवळी रा.काँ.चे शहर अध्यक्ष अमर चोपदार रा.काँ युवकचे तालुका कार्याध्यक्ष शरद जगदाळे स्वर्गीय आर आर आबा पाटील विचार मंच संस्थापक अध्यक्ष तथा पञकार कुमार नाईकवाडी अँड धिरज जाधव रा.काँ.चे जयराज भोसले व्यापारी राजाभाऊ चोपदार शैलेश जैस्वाल भैय्या दिक्षित शेखर कदम बिभीशन यादव आदीची उपस्थिती होती