तुळजापूर / प्रतिनिधी-
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धपान दिना निमित्ताने रविवार दि.१५रोजी श्री तुळजाभवानी मंदीरावर तिरंगा ध्वज फडकावुन श्री तुळजाभवानीस प्रार्थना करण्यात आली. श्रीतुळजाभवानी मंदीरात सकाळी मंदीराचा प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला व तुळजाभवानी देविस तिरंगी फुलांचा हार व वेणी घालुन गर्भगृह तिरंगी फुलांनी सजवले होते.
तसेच नगरपरिषदवर नगराध्यक्ष सचिन रोचकरी, कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती विजय गंगणे, तहसिलवर तहसिलदार सौदागर सांळुके यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.