उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथील एम. आय. डी. सी. एरियामध्ये रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कांही निर्जन ठिकाणी सर्रास दारूच्या पाटर्चा केल्या जात आहेत. देवी मंदिर, डॅम पॉईंट, रायगड इंडस्ट्री कॉर्नर, माऊली पाईप कॉर्नर तसेच आरटीओ ऑफिस परिसरात या पार्ट्या होत आहेत. सदर ठिकाणाचे निरीक्षण केल्यास, दारूच्या बाटल्यांचा तसेच प्लास्टिक कप व पाणी बाटल्यांचा खच पडलेला दिसून येतो त्यामुळे या भागातील   होत असल्या ह्या पार्ट्या  थांबविण्याची मागणी फोरम ऑफ उस्मानाबाद सिटिझन्स (फूक) संघटनेच्या वतीने  आनंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, आनंदनगर पोलिस ठाणे   व रायगड स्टील सर्व्हिसेस यांच्या संयुक्त सौजन्याने, साधारण दोन महिन्यापूर्वी सदर ठिकाणी प्रतिबंधात्मक डिजिटल  सूचना फलक लावले होते. परंतु संबंधित दारूड्यानी कांही ठिकाणचे सदर फलक काढूनही टाकले आहेत. त्यामुळे दारूड्यांची हिम्मत वाढल्याचे दिसते.एम. आय. डी. सी एरियात रोड चांगले असल्याने व स्वछ आणि फ्रेश हवा असल्याने बरेच स्त्री -पुरुष सकाळ व संध्याकाळी फिरण्यासाठी जातात. त्यामध्ये बरेच फॅमिली असतात. त्यावेळी हे दारुडे स्त्रिया व मुलीकडे वाईट नजरेने पाहून टॉन्टिंग करतात. एकंदरीत दारूच्या पार्ट्या  करणाऱ्यामुळे सदर भागातील वातावरण हे सामान्य नागरिक व स्त्रियांसाठी असुरक्षित बनले आहे. तरी   बेकायदेशीर प्रकारास त्वरित पायबंद घालण्याची मागणी करण्यात आली आहे. 

निवेदनावर अध्यक्ष एम.डी.देशमुख, उपाध्यक्ष मुकेश नायगांवकर, सहसचिव गणेश वाघमारे, सचिव धर्मवीर कदम, कोषाध्यक्ष आर.बी. भोसले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top