उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रात निसर्गाने थैमान घातले असून या मध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत, अनेकांच्या घरामध्ये पाणीच पाणी शिरल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात घरे वाहून गेले आहेत, घरे पडले आहेत, त्यामुळे अनेकांचे संसार उडघ्यावर आले आहेत.त्यामुळे पुरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने टाकळी येथील युवक आणि ग्रामस्थांनी अन्नधान्य आणि संसार उपयोगी साहित्य पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून पाठविण्याचे ठरविले आहे.

चला पुरग्रस्तांना हातभार लावूया, या मथळ्या खाली येथील युवकांनी गावातील सोशल मीडिया ग्रुपवर पुरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आव्हान केले होते. त्या नंतर मोठ्या प्रमाणावर मदत ओघ सुरु झाला. पुणे, मुंबई ठाणे, भिवंडी, आदी भागात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी नेट बँकिंग द्वारे शक्य होईल तेवढी मदत ऑनलाईन पाठवायला सुरुवात केली,तर गावातील युवकांनी गव्हू, तांदूळ ज्वारीच्या स्वरूपात गावामध्ये फिरून जवळपास ५ क्विंटल गव्हू, ४ क्विंटल तांदूळ, २ क्विंटल ज्वारी इतकी मदत धान्य स्वरूपात जमा केली,आणि पुरग्रस्तांसाठी गावातून रोख रक्कमेतून त्यासह ऑनलाईन आणि गावातील सुपुत्र श्री. सुर्यकांत श्रीमंत खटके यांनी की जे उल्हासनगर महानगरपालिके मध्ये उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत यांनी केलेल्या मोठ्या मदतीतून संसार उपयोगी किराणा खरेदी करण्यात आला आली. त्यातून येथील नागरिकांचा १५१ किटचा संकल्प असताना तरी पण १८८ किट तयार झाले. या किटमध्ये ज्वारी,गव्हू ,तांदूळ, साखर, चहापूड, पोहे, शेंगदाणे, हळद, मिरची, मीठ,बिस्कीट, डेटॉल साबण, हँडवॉश, निरमा,कोलगेट,  असे एकूण १७ साहित्याची किट बनवून पुरग्रस्तांसाठी पाठवण्यात येणार असून,  ज्या ठिकाणी कोणाचीच मदत पोहचली नाही त्या ठिकाणी ही मदत समस्त टाकळीकरांच्या मदतीने पोहच करण्यात येणार आहे.


 
Top