तुळजापूर / प्रतिनिधी- 

शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला व दुध बेभाव किमतीत विक्री होत असल्याचा पार्श्वभूमीवर भाजीपाला पिकांना क्विंटला  एक हजार रुपये  अनुदान व  एक लाख रुपये  नुकसान भरपाई देण्याचा मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर  टमाटे, शिमला मिर्ची ओतुन शुक्रवार दि. २६रोजी आंदोलन करण्यात आले. या संदर्भात ठोस उपाययोजना नाही केल्या तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

आंदोलनात  स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, राजाभाऊ हाके, तानाजी पाटील, भाऊसाहेब मुंढे , दुर्वास भोजणे,  नेताजी जमदाडे, प्रदीप जगदाळेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. 

 
Top