उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आमचा देश हा आमच्या अस्मितेचा विषय आहे आणि देशाच्या स्वातंत्र्याचे कितवे वर्ष हे माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला माहिती नसणे हे राज्याचे दुर्दैव आहे. देशाचा अभिमान असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला हिरक महोत्सव म्हणून संबोधने आपल्या सारख्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला शोभते का..?

राज्यात युवांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण काही काम कराल यावरून आता सर्वांचाच विश्वास उडाला आहे, मात्र किमान देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तरी आपण लक्षात ठेवावा एवढीच आपल्याकडून माफक अपेक्षा आहे.

याप्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर ,युवा मोर्चा प्र का सदस्य मकरंद पाटील ,भाजप जिल्हाउपाध्यक्ष इंद्रजित देवकते  ,एस सी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रवीण शिरसाट ,तालुका अध्यक्ष ओम नाईकवाडी ,जिल्हा चिटणीस गणेश एडके ,हिम्मत भोसले ,नरेन वाघमारे ,स्वप्नील नाईकवाडी ,शरीफ शेख ,जयपाल मुंडे ,प्रसाद राजमाने व इतर युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते .

 
Top