कळंब  / प्रतिनिधी-

27 ऑगस्ट या दिवशी सावित्रीबाई फुले विद्यालय कळंब येथील गणित विषयाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री सुधीर मुरलीधर भवरसर यांचा वाढदिवस असतो. नऊवर्षापूर्वी त्यांचा वाढदिवस इयत्ता 10वी चे(२०११-१२) विद्यार्थांनी भवरसरांचा  वाढदिवस शाळेत वृक्षारोपण करून साजरा केला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी भवर सरांसोबत या झाडांचा  वाढदिवस  शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती प्रतिभा रामचंद्र गांगर्डे/भवर(स्काऊट-गाईड कँप्टन) हा दिवस साजरा करतात .ही झाडे आज नऊ वर्षांची झाली. त्यामुळे झाडांचा नववा वाढदिवस  साजरा केला .

यावेळी सुधीर भवरसरांसोबत या झाडांनावाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मु.अ.प्रा.जे.डी.कुपकरसर,श्री.आसाराम वाघमारेसर (सरपंच बाभळगाव),  प्रा.सोनवणे सर,प्रा.धोंगडे सर,प्रा.कापरेसर प्रा.माळीसर, श्री. श्रीराम काळेसर, श्री.नाना सावंत,श्री.सोमनाथ सावंतसर, श्री.जिवनसिंह ठाकूरसर (स्काऊट मास्टर),श्री.टारपेसर, श्रीमती साचणे मँडम, श्री.पाळवदेसर (राष्ट्रीय हरित सेना प्रमुख) हे उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे श्रीमती प्रतिभा गांगर्डे मँडम यांनी आभार मानले व श्री. सुधीर भवरसरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 
Top