उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र दिले आहे. पोलीस अधीक्षक रौशन यांनी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा क्रमांक 174/2015 मध्ये नोंद असलेल्या 302,120(ब),201, 34 या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केला होता. या गुन्ह्याची महाराष्ट्र राज्यात डिसेंबर 2020 महिन्यासाठीच्या सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.या कामगिरी करिता त्यांना गौरविण्यात आले आहे.उस्मानाबाद पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटच्या मदतीने रौशन यांनी न उलघडलेल्या या गुन्ह्याचा तपास लावला ज्यामुळे 3 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

केवळ मुलीच्या अंगावरील कुर्त्याच्या लेबल वरून फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटच्या मदतीने हा हायटेक तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या . आरोपीने मैत्रिणीला गिफ्ट म्हणून दिलेला कुर्ताच अखेर त्याच्यासाठी महागडा ठरला असून त्यामुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला.

उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे २१ डिसेंबरला २०१५ रोजी एका विहिरीत एका तरुण मुलीचा मृतदेह आढळून आला होता यानंतर उस्मानाबाद पोलसांनी गुन्हा नोंद करून या मुलीचा शोध सुरु केला व अवघ्या १० दिवसात या मुलीची ओळख पटवत तिच्या हत्यारयाना सुद्धा गजाआड केले .हि मयत मुलगी कांचन परदेसी असून ती गेल्या वर्षी जुलै २०१५ पासून घरातून पळून गेलेली होती , मृत मुलगी कांचन परदेसी हिच्या पोटावर - मानेवर धारदार शस्त्राच्या जखमा होत्या. मयत मुलीच्या अंगावर राजस्थानी स्टाईलचा कुर्ता होता आणि हाच कुर्ता आरोपीपर्यंत पाहोच्ण्यास मदतीचा ठरला . मुलीच्या अंगातील कुर्त्याच्या लेबलवरुन तो कुर्ता कुठे तयार करतात याची माहिती मिळवली . राजस्थान कुर्ता अशा प्रकारचे कुर्ते तयार करून ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीना विकत असल्याचे समोर आले.या कुर्ताच्या पाठीमागे कुर्ता डॉट कॉम असे लिहले होते.रौशन यांनी या कंपनीला इमेल करून माहिती मागवली असता हा अश्या प्रकारचा कुर्ता फ्लिपकार्टवरुन जास्त प्रमाणात विकला व खरेदी केला जात असल्याचे समोर आले तेव्हा देशातील सर्व ऑनलाईन कुर्ता विक्री करणाऱ्या कंपनी यांच्या अधिकारी यांना उस्मानाबाद पोलिसांनी पत्र लिहून कुर्ता खरेदी करणाऱ्या ग्राहकांची यादी मागवली . फ्लिपकार्ट या कंपनीने वर्षभरातील ग्राहक यांची माहिती उस्मानाबाद पोलिसांना दिली . या यादीतून खुनी ओळखणे महाकठीण असताना मयत कांचनचा मृतदेह ज्या ठिकाणी वाघोली गावात सापडला त्या ठिकाणी असलेल्या सर्व मोबाईलचे लोकेशन मागवून घेतले व तपास सुरु केला .आयआयटी शिक्षण केलेल्या पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी आधुनिक शिक्षणाचा वापर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी करीत मोबाईल कंपनी यांनी दिलेली फोन कॉलची यादी आणि कुर्ता खरेदी करणाऱ्या मोबाईलचा नंबर यापैकी एक असल्याचे उघड झाले  आणि मयत कांचनच्या खुन्यापर्यंत पोलिस पाहोचले .आरोपी प्रकाश सुर्यकांत चाफेकर आणि कांचन परदेशी यांच्यात २०१० पासून प्रेमसंबध असल्याचे समोर आले असून पुण्याच्या एका कंपनीत दोघेही एकत्र कामाला होते. प्रकाश हा नागपूर येथे एका कंपनीत कामाला आला होता. प्रकाश विवाहित असल्याचेही समोर आल आहे. हा कुर्ताही त्यानेच कांचनला ऑनलाईन खरेदी घेवून गिफ्ट म्हणून दिला होता आणि तोच या खून तपासाचा मोठा आधार ठरला.प्रेयसीला दिलेले हे गिफ्ट त्याला चांगलेच महागात पडले.पुणे येथे जुलै २०१५ ला कांचन परदेशी हरवल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी येरवडा भागातील पोलीस स्टेशनला दिली होती.


 
Top