कळंब  / प्रतिनिधी-

 कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नसून दहीहंडी गणेशोत्सवाचे सण आहेत.सण-उत्सव साजरे करीत असताना आपल्या घरातच राहून साजरे करावेत.सार्वजनिक ठिकाणी गर्दी अथवा मिरवणूक काढता येणार नाही, असे आवाहन पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांनी केले.

शांतता कमिटी,ज्येष्ठ नागरिक व पोलीस पाटीलांची बैठक दि.२९ ऑगस्ट रोजी पोलिस स्टेशनमध्ये संपन्न झाली .

पुढे बोलताना पो.नि.दराडे म्हणाले की कोरोनाच्या प्रतिबंधात्मक या विष्याच्यावआदेशात काहीही बदल केलेला नसून गणेश मूर्ती स्थापन करीत असताना घरात दोन फूट पर्यंत तर सार्वजनिक ठिकाणी चार फुटापर्यंत मूर्ती प्रतिष्ठापना करता येईल तसेच याविषयीच्या नियमाची व अटीची माहिती गणेश मुर्ती प्रतिष्ठापना परवाना घेताना मंडळांना देण्यात येईल व कोणत्याही प्रकारे कोरोना संसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी व शहरातील मेन रोड येथे सम विषम तारखेस दुचाकी पार्किंग व्यवस्था विषयी सहकार्य करावे असे आवाहन केले.

  या बैठकीच्या सुरुवातीला शांतता कमिटी सदस्य कमलाकर कोकीळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 या बैठकीत ह.भ.प.महादेव महाराज आडसुळ,डी.के.कुलकर्णी,अँड. त्रिंबकराव मनगिरे,विलासराव करंजकर, सुरेश टेकाळे, माधवसिंग राजपूत, सचिन क्षिरसागर, ज्योती सपाटे,भास्कर सोनवणे,बंडू ताटे, रुकसना सौदागर, पोलीस पाटील दत्तात्रय कोल्हे, शिवाजी गायकवाड, मनोहर सुरवसे,पोलीस पाटील, काकडे यांनी मनोगते व्यक्त केली. या बैठकीचे प्रास्ताविक साहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी तर आभार मायंदे यांनी मानले.

यावेळी पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील तसेच शांतता समितीचे सदस्य  उपस्थित होते . 

 
Top