उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 मी पॅकेज देणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे असे वक्तव्य करणाऱ्या मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेबांना उस्मानाबादचा मात्र विसर पडलेला दिसतो. खरीप २०२० मधील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी अनुज्ञेय पिक विमा नुकसान भरपाई पासुन जिल्हयातील शेतकरी आजही वंचित आहे. शासनाने तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या अपमान केला आहे, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर उस्मानाबाद कारांना दिलेले भरीव मदतीचे आश्वासन मुख्यमंत्री पुर्ण करत नाहीत. अनेक वेळा मागणी करुन देखील पीक विम्या बाबत साधी बैठक लावली जात नाही. जिल्हयातील बहुतांश प्रलंबित कामे शिवसेनेकडे असणाऱ्या विभागांशी  निगडीत असुन शिवसेनेकडुन जिल्हयाला सापत्नीक वागणुक दिली जात असल्याचा घणाघात आ.राणाजगजितसिंहजी पाटील  यांनी उंबरेगव्हाण, नांदुर्गा व भंडारी येथील विकास कामांच्या भुमीपुजन कार्यक्रमात बोलताना केला.

 खरीप २०२० मध्ये अतिवृष्टीने झालेल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आजवर विमा भरपाई मिळालेली नाही. कृषी मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार मागणी करुन देखील या बाबत साधी बैठक बोलावली जात नाही. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे कृषी व महसुल विभागाने केलेले पंचनामे शासनाला मान्य आहेत, परंतू या पंचनाम्यातुन निष्पन्न झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपनी कडुन नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी शासन स्तराहुन ठोस कारवाई का होत नाही, हे मोठे गुपीतच आहे.

  प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील भंडारी येथे रामा २३८ ते भंडारी या रु. ९० लक्ष किमतीच्या व  उमरेगव्हाण ते वडारवस्ती या रु.५० लक्षं किमतीच्या रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जेष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यासाठी भंडारी येथील ग्रामस्थ व उमरे गव्हाण येथील कै.सिताबाई सामाजिक संस्था पदाधिकारी व ग्रामस्थांची मागणी होती. या कामामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची  होत असलेली गैरसोय थांबणार आहे. यासह नांदुर्गा येथे आमदार निधी मधून देण्यात आलेल्या सभामंडपा चे भुमीपुजन करण्यात आले.

 उस्मानाबाद जिल्हयातील मतदारांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भरभरुण देऊन देखील ‍जिल्हयातील अति महत्वाच्या रखडलेल्या प्रकाल्पा बाबत मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांकडून निर्णय घेतले जात नाहीत, येथील विकास कामांना पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला जात नाही. कौडगाव औद्योगिक वसाहती मधील ५० मे. वॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प व टेक्नीकल टेक्स्टाईल हब हे दोन्ही विषय उद्योगमंत्री यांच्याकडे अनेक वर्षा पासुन प्रलंबित आहेत. शिवसेने कडून शेतकऱ्यांच्या संवेदनशील विषयांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष का केले जात आहे, की त्याला काही अर्थपुर्ण किनार आहे असा सवाल शेतकऱ्यांकडुन उपस्थीत केला जात आहे. यातुन शिवसेनेचे जिल्हावासींया प्रती असलेले नाटकी प्रेम किती नाटकी आहे हे स्पष्ट होते, असे वक्तव्य आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी याप्रसंगी बोलतांना केले.

 याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.अस्मिताताई कांबळे, भाजप जिल्हा संयोजक श्री.नेताजी पाटील, तालुकाध्यक्ष श्री.राजाभाऊ पाटील, जि. प.अर्थ व बांधकाम सभापती श्री.दत्ता देवळकर, श्री.बालाजी गावडे, श्री.भारत डोलारे, श्री.राजाभाऊ कोळगे, श्री.महेश चांदणे, श्री.राजाभाऊ सोनटक्के, श्री.किरण बनसोडे, श्री.संजय पाटील, लिंबराज साळुंके, श्री.बप्पा जाधव, श्री.प्रदीप पाटील, श्री.अण्णा दाते, श्री.दयानंद जगताप, नांदुर्गा गावातील हनुमंत पाटील, वसंतराव  कारभारी खटके, पांडुरंग पाटील, सरपंच ललिताबाई जगताप, माणिकराव पाटील, मोहन पाटील, संतोष खटके, गोपाळ पाटील, रणजित बनसोडे, दत्ता जगताप, गौतम काबंळे, माणिक कांबळे, महेंद्र बनसोडे, गोविंद खटके, अभिजित पाटील, सुजित पाटील यांच्यासह गावातील प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top