तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील शेतकरी चरण राजपूत यांच्या शेतात सापडलेल्या जखमी अवस्थेतील लांडोरला उस्मानाबाद येथील प्राणीमित्र सुरज मस्के यांनी जीवदान दिले आहे.

 तेर येथील चरण राजपूत यांच्या शेतात लांडोर जखमी अवस्थेत आढळला होता .चरण राजपूत यांनी प्राणीमित्र सुरज मस्के यांच्याशी संपर्क साधला. सुरज मस्के यांनी तेर येथील आशिष वाघमारे यांच्यासह तेर येथे येऊन लांडोरला उस्मानाबादला नेले. त्यांनी वन विभागाशी संपर्क साधून उस्मानाबाद येथे वनविभागाकडे  लांडोरला सोपवले. तिथे जखमी लांडोरवर उपचार करण्यात आले.


 
Top