उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हयातील सर्व न्यास,संस्था चालकांनी महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंध्दुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली इतर जिल्हयांमध्ये आलेल्या महापूरामुळे खूप मोठी जिवीतहानी आणि नुकसान झालेले आहे. कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र शासन त्यांच्या परिने सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे.तथापि जिल्हयातील सर्व धर्मदाय संस्थांनी पूरग्रस्तांना मदत करावी,असे आवाहनही येथील सहायता धर्मदाय आयुक्त यांनी केले आहे.

  महापूरामुळे,दरड कोसळल्यामुळे आणि लॉक डॉऊनमुळे महाराष्ट्रात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, गरीब आणि कष्टकरी तसेच मजूर यांच्या दैनंदिन गजा भागविण्यासाठी, त्यांना जीवनाश्यक वस्तू, अन्नधान्य, औषधोपचाराची, इत्यादी, मदत करण्याची आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आर्थिक स्वरुपात मदत करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.

 सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक उत्तरदायित्वचा उद्देशाने स्थापन झालेल्या सर्व धर्मादाय संस्थांनी (ट्रस्ट) या कामी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दि.28 जुलै-2021 रोजीच्या परिपत्रकान्वये महाराष्ट्रातील सर्व न्यासांच्या विश्वस्थांनी पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरुन पूरग्रस्तांना योग्य ती मदत करता येईल, त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयातील सर्व न्यास,संस्था यांनी या कार्यालयामार्फत पुढील बँक खात्यावर चेक किंवा डी. डी. द्वारे शक्य तेवढी मदत लवकर द्यावी. तसेच केलेल्या आर्थिक मदतीचा विवरण येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सादर करावी,असेही आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त यांनी केले आहे.

 मुख्यमंत्री सहायता निधी बँक खात्याचा तपशील-

 मुख्यमंत्री सहायता निधी-बचत खाते क्रमांक-10972433751,स्टेट बँक ऑफ इंडिया,मुंबई मुख्य शाखा,फार्ट,मुंबई-400 001,शाखा कार्ड-00300,आयएफएस कोड-SBIN0000300  येथे जमा करावी,असे  आवाहन  सहायक धर्मादाय आयुक्त यांनी केले आहे.


 
Top