उस्मानाबाद / प्रतिनिधी-

लघु उद्योग भारती उस्मानाबाद चे नूतन अध्यक्ष निशांत भारत होनमुटे व नूतन सचिव विकास अनिलराव बेलुरे यांचा पदग्रहण समारंभ लघु उद्योग भारती एस आर के सभागृह एमआयडीसी उस्मानाबाद येथे उत्सहात पार पडला .

सदर कार्यक्रम लघु उद्योग भारतीचे राष्ट्रीय महामंत्री श्री गोविंदजी लेले यांच्या अध्यक्षतेखाली श्री संजय देशमाने (ल.उ.भा.महाराष्ट्र संयोजक) ,श्री अशोक राठी (देवगिरी प्रांत अध्यक्ष ल.उ.भा).,  श्री पी. डी.हनभर (महाव्यवस्थापक जी.उ.केंद्र उस्मानाबाद) यांचे प्रमुख उपस्थितीत मावळते अध्यक्ष श्री सुनील गर्जे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे प्रदान करण्यात आली.

या प्रसंगी बोलताना राष्ट्रीय महामंत्री श्री लेले यांनी उद्योजकाचा स्वभाव नदी सारखा असावा तसेच आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त पैसा कमावणे नसून एक सामाजिक आंदोलन जे उद्योगातून राष्ट्रनिर्मिती करिता असावे, असे प्रतिपादन करीत असताना प्रत्येक यशस्वी उद्योजकाने एक नवीन उद्योजक निर्माण करावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमास यशस्वी उद्योजक श्री संतोष शेटे , श्री पी आर काळे , कोषाध्यक्ष श्री राजेंद्र भंडारी , कार्यकारिणी सदस्यउद्योजक तय्यब दारूवाला, गजानन मसलेकर, , प्रशांत ढगे, किरण इंगळे ,प्रशांत कुलकर्णी ,नारायण गाढे ,प्रमोद बेलुरे, फेरोज शेख,निखील हुकिरे, मदन कुलकर्णी, सम्भुदेव खटीग, हेमंत इंदापूरकर, संजय शेटे, सचिन पाटील, अजिंक्य काळे ,आणि ल.उ.भा.उस्मानाबाद चे सर्व सदस्यउद्योजक सहकुटुंब उपस्थित होते .

 
Top